राहुल – मोदींसाठी आता बुलेटप्रुफ पोडियम

नवी दिल्ली  :  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्व राज्यातील सर्व जाहीर सभांमध्ये बुलेटप्रुफ पोडियमची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या निर्देशांमध्ये राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये मोबाईल जामर लावण्याची सूचनाही देण्यात आल्यात. Advertisements

बस आगीत 45 जणांचा मृत्यू

महबूबनगर :   आंध्रप्रदेशमधील महबूबनगर जिल्ह्यात बंगळूरु-हैदराबाद महामार्गावर कोठाकोटा येथे व्होल्वो बसची इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागून बसमधील ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला . बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.हैदराबादमधील जब्बार ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकीची ही एसी व्होल्वो बस बंगळूरुहून हैद्राबादला जाण्यासाठी निघाली होती.

दिवाळीत मुंबईमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्याची शक्यता

मुंबई :   बिहारमधील पाटणा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. दिवाळीच्या सणात हल्ल्याची शक्यता असल्याने मुंबईसह अन्य शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.सणासुदीच्या काळात गुप्तचर विभागाने राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्याता व्यक्तर केली आहे,

मुंबईची गरज लागणार नाही - राहुल गांधी

हमीरपूर :  काँग्रेसला उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे. आमचं सरकार आलं तर इथेही आम्ही महाराष्ट्र, केरळ व राजस्थानसारखा विकास करू, असे सांगतानाच, ङ्कबुंदेलखंडचा विकास असा करू की तुम्हाला मुंबईला जाण्याची गरज लागणार नाही,

खाजगी वाहनांवर पोलीस लोगो वापरण्यास बंदी

मुंबई:  पाटणामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सावधानतेचा इशारा म्हणून मुंबई पोलिसांनी खाजगी वाहनांवर पोलीस लोगो न लावण्याचे पत्रक काढले आहे. अनेक पोलीस कर्मचारी आपल्या खासगी वाहनांवर पोलीस लोगो लावतात. मात्र आता यापुढे पोलीस लोगो असलेल्या खाजगी वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी या पत्रकात नमुद केल आहे.‘

डिझेल सिलेंडर महागण्याची शक्यता

नवी दिल्ली :  सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची शिफारस किरीट पारीख समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.

सावकारी कायदा लागू करण्याचा मार्ग मोकळा

मुंबई :  गरीब शेतकèयांची पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सावकारी कायद्यात केंद्राने सुचवलेल्या सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने आता राज्यात हा कायदा लागू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे