येत्या काळात पीक कर्जाचे वाटप वाढणार – शरद पवार

Untitled-1अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज हा मोठा आधार असल्यामुळे अधिकाधिक पीक कर्ज वाटपावर सरकारने भर दिला असून ८० हजार कोटी असलेले पीक कर्ज वाटप आता ७ लाख कोटी पर्यंत दिले जात आहे. येत्या काही वर्षात ते १५ लाख कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कै.डॉ.वा.रा. उर्फ अण्णासाहेब कोरपे यांच्या पूर्णाकृती प्रेरणा शिल्पाचे अनावरण आणि रुपे केसीसी डेबीट कार्डचा शुभांरभ  पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार संजय धोत्रे, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आमदार व बँकेचे संचालक, सहकारातील जिल्ह्यातील नेते, शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.राज्यात यशस्वीपणे सहकारी बँक चालविणाèया बँकांमध्ये शतकपूर्ती केलेल्या अकोला सहकारी बँकेचा श्री. पवार यांनी विशेष गौरव केला. सहकारात सभासदांना अधिक मजबूत करण्यासाठी सहकार कायद्यात मोठे बदल केंद्र सरकारने केले आहेत. महाराष्ट्र शासनानेही या कायद्यातील बदल स्वीकारल्यामुळे सहकाराला नवे बळ मिळेल, असे प्रतिपादनही  पवार यांनी यावेळी केले.शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात मिळणारे पीक कर्जाचे व्याज अजून कमी करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून गरीबातल्या गरीबाला अन्न मिळाले पाहिजे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे ते आता मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांनच्या शेतीलाही योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही  पवारांनी यावेळी सांगितले.

विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान झाले आहे, आपण स्वत: त्याची पाहणी केली आहे. केंद्रीय पथकांनी देखील या भागाची पाहणी केली आहे. राज्य शासनाकडूनही त्यांचा सविस्तर अहवाल आला आहे. परवा आपल्या अध्यक्षतेखाली या संदर्भात होणाèया बैठकीत अतिवृष्टीसंदर्भातील नुकसान भरपाई आपण योग्य प्रमाणात देऊ, असे आश्वासन श्री. पवार यांनी विदर्भातील शेतकèयांना दिले.

One thought on “येत्या काळात पीक कर्जाचे वाटप वाढणार – शरद पवार

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s