तुरुंगातूनही निवडणूक लढवणे होणार शक्य

नवी दिल्ली, दि. १९ : तुरुंगात असलेल्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक दिलासा दिला आहे. तुरुंगातून निवडणूक लढविण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. लोकसभेत संमत करण्यात आलेल्या दुरुस्ती विधेयकाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तुरुंगात असलेल्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे. Advertisements

कॅम्पाकोला खाली करावचं लागणार : सर्वोच्च न्यायालय

मुंबई, दि. १९ : वरळीतील कॅम्पा कोला कंपाउंडमधील अनधिकृत फ्लॅट असलेल्या रहिवाशांना ३१ मे २०१४ पर्यंत घरे खाली करण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. केवळ मानवतेच्या दृष्ठिकोनातून आपण ही मुदत वाढवून देत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच घरे खाली करण्यासाठी सहा आठवड्यात हमीपत्र देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

देशातील पहिल्या महिला बँकेचे उद्धाटन

मुंबई, दि. १९  : भारतीय महिला बँक या देशातील पहिल्या महिला बँकेचं आज उद्धाटन झालं. नरिमन पॉर्इंट परिसरातील एयर इंडियाच्या तळमजल्यावर महिला बँकेची पहिली शाखा सुरु होत आहे. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंह, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम उपस्थित होते. माजी पतंप्रधान इंदिरा गांधींच्या जन्मदिवसाचं निमित्त साधून आज मुंबईत संपूर्णपणे महिलांनी चालवलेल्या सरकारी…

गृहनिर्माण विधेयकाला राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र

मुंबई : कॅम्पाकोला कंम्पाऊंड इमारत प्रकरणाने गृहबांधणी उद्योग क्षेत्रात प्रभावी नियामक यंत्रणेची आवश्यकता अधोरेखित केली आहे, यामुळे महाराष्ट्र विधीमंडळाच्या उभय सभागृहांनी संमत करून केंद्र सरकारकडे पाठविलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण (नियंत्रण व विकास) विधेयक २०१२ ला मा.राष्ट्रपती यांची तातडीने मंजुरी घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री डॉ.गिरीजा व्यास यांना…

मराठा आरक्षणाचा अहवाल निवडणुकीपूर्वी : नारायण राणे

नाशिक: मराठा आरक्षणाबाबत राणे समितीचा अहवाल निवडणूकीपूर्वी राज्य सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती नारायण राणे यांनी आज नाशिकमध्ये दिली. राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज नाशिक दौऱ्यात विविध संघटनांचे म्हणणे ऐकले.मराठा आरक्षणाच्या विरोधात निवेदनं देण्यासाठीही यावेळी गर्दी झाली होती. दलित आणि इतर मागासवर्गियांच्या शिष्टमंडळांनीही समितीसमोर निवेदने सादर करून मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला. सुमारे साडेतीनशे निवेदनं…

अश्लिल संकेतस्थळे ब्लॉक करणे आवश्यक – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. १८ : अश्लिल मजकूर असलेली संकेतस्थळं भारतात ब्लॉक कशी करायची, याची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दूरसंचार विभागाला दिले. न्यायालयाने केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस बजावली असून, तीन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दूरसंचार विभाग हा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.न्या. बी. एस. चौहान यांच्या नेतृत्त्वाखाली पीठाने हे…

कळव्यात इमारत कोसळली

ठाणे, दि. १८ : मुंबई आणि ठाण्यात इमारती पडण्याचे सत्र सुरूच आहे. कळव्यात भुसारआळी येथे रविवारी रात्री दीडच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. अन्नपूर्णा अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळत असल्याचे रहिवाशांचा लक्षात आले. त्यामुळे रहिवाशांनी ताबडतोब इमारत रिकामी केली.