गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : इशारा देऊनही बीसीसीआय अध्यक्षपदाची खूर्ची न सोडणाèया एन.श्रीनिवासन यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही काळासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन दूर केले असून, त्यांच्या जागी भारताचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.सुनील गावस्कर यांच्याकडे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्षपदासह आयपीएलच्या सातव्या मोसमाची सूत्रे देण्यात आली आहेत. Advertisements

सी- १३० जे सुपर हरक्युल्स विमान कोसळले, पाच ठार

ग्वाल्हेर : अमेरिकेकडून विकत घेतलेले सी-१३० जे सुपर हरक्युल्स हे अत्याधुनिक वाहतूक विमान शुक्रवारी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरजवळ कोसळले. या अपघातात विमानातील वैमानिक आणि अन्य क्रू सदस्य असे पाच जण ठार झाल्याचे हवाई दलातील अधिकाèयांनी सांगितले.आग्रा येथील हवाई दलाच्या तळावरुन सकाळी दहाच्या सुमारास नियमित सरावासाठी उडालेले हे विमान ग्वाल्हेरला कोसळले.

गैरवर्तवणुकीने नगमा हैराण

मिरत : अभिनेत्री नगमा कार्यकत्र्यांच्या गैरवर्तवणुकीने हैराण झाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्याच एका आमदाराने भरसभेत नगमाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. आता कार्यकत्र्यांनी गैरवर्तवणूक केल्याने संतापलेल्या नगमाने चक्क एका कार्यकत्र्याच्या कानाखाली जाळ काढला.नगमा मिरत येथून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवित आहे.

काळ्या पैशावर ७०० अधिकारी ठेवणार नजर

नवी दिल्ली :लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापरावर ७०० ‘आयआरएस (भारतीय महसूल सेवा) अधिकारी नजर ठेवतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आयोगाने प्राप्तीकर, अबकारी खात्यांना अधिका़रयांदी यादी लवकरच सादर करा, असा आदेशही दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गारपीटग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे

नवी दिल्ली :गारपीटग्रस्तांना लवकरात लवकर योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि त्यासाठी निवडणूक आचारसंहिता आड येऊ नये, या मागणीसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन qसग यांची भेट घेतली. तर याच मागणीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपाल के. शंकरनारायणन यांना मुंबईत भेटले.

अण्णांचा ममतांसोबतही काडीमोड

नवी दिल्ली :तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची साथ सोडत असल्याची घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली.  तसेच लोकसभेतील कोणत्याही उमेदवाराला आपण पाqठबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अण्णा हजारे यांनी काही दिवसांपासून आपल्या १७ मुद्द़यांबाबत सहमती दर्शविल्याने ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदासाठी पाqठबा देत असल्याचे जाहीर केले होते.

अन्नसुरक्षेवरून मोदींची काँग्रेसवर टीका

ओडिशा :देशात ६० वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. तरीही महागाई वाढली आहे. काँग्रेसला इतक्या वर्षांनी अन्नसुरक्षा कायदा आठवला का, असा परखड सवाल भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत केला.मोदी म्हणाले, देशात ६० वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. तरीही महागाई वाढत आहे.