अखिल भारतीय मराठा महासंघ- राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन

अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन २०१४ रविवार दि. ०३ ऑगस्ट २०१४ रोजी कोल्हापूर येथे होणार आहे….  

राहुल गांधीच्या सभेकरीता शाळेचा पेपर रद्द

वर्धा : काँगे्रसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाची परीक्षेचा पेपर रद्द करून काँगे्रस नेत्यांनी आपल्या नेत्याची सभा घेतल्याने वर्धेकरांमध्ये उलटसुलट चर्चेला उत आलेला आहे. निवडणुकीची प्रचारसभा महत्त्वाची की परीक्षा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशप्रक्रिया २४ मार्चपासून

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बालकांना बालवाडी किंवा इयत्ता पहिलीला आरक्षणानुसार २५ टक्के प्रवेशप्रक्रिया २४ ते २९ मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी आज दिली. शाळेची इंटड्ढी पाईंट असलेल्या वर्गात २५ टक्के प्रवेश आरक्षणानुसार देण्यात येईल.

महायुतीला कोणाचीही गरज नाही : मुंडे

अमरावती : युतीचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. यंदा बहुमताने महायुती सत्तेवर येणार असून, आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोला भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी मनसेला लगावला. महायुतीच्या महासभेचे अमरावती येथे आयेजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाईचे रामदास आठवले, स्वाभिमानीचे राजू शेट्टी या वेळी उपस्थित होते.

भटकळला पोलीस कोठडी

पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी यासीन भटकळला शुक्रवारी पुणे न्यायालयान हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १३ फेब्रुवारी २०१० रोजी कोरेगाव पार्क परिसरात असणाèया जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

काँग्रेसतर्फे पुण्यातून विश्वजित कदम?

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. पुणे लोकसभेसाठी आमदार विनायक निम्हण, मोहन जोशी, शहराध्यक्ष अभय छाजेड यांची नावे प्रामुख्याने चर्चेत होती.

विकासकामांना कात्री लावून मदतीवर भर देऊ – मुख्यमंत्री

यवतमाळ : सुरुवातीला या संकटाचा अंदाज आला नाही. मात्र राज्यभर दौरा करताना संकट किती मोठे आहे, हे लक्षात आले. कधीही कुणीही बघितले नाही, अशी गारपीट राज्यभर होत आहे. दोन वर्ष मराठवाड्यात दुष्काळ, विदर्भात अतीवृष्टी आणि आता गारपीट होत आहे. या आपदेतून सावरण्यासाठी केंद्रीय समितीकडे आर्थिक मदतीची मागणी केली जाणार आहे,

गारपीटग्रस्तांसाठी कुलगुरुंकडून एक महिन्यांचा पगार

जळगाव : गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकèयांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तसंच विद्यापीठातील प्राध्यापक अधिकारी आणि कर्मचारी हे देखील गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी उमविच्या सर्व कर्मचाèयांनी आपला एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा केली आहे.

रायगडमधून तटकरेंना उमेदवारी

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित केली आहे. जाधव यांनी मुंबईत याची घोषणा केली. राष्ट्रवादीने ही जागा तटकरे यांच्यासाठी काँग्रेसकडून मागून घेतली होती. त्यानुसार त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

गारपिटीची वैज्ञानिक चिकित्सा करण्याची मागणी

पुणे : गारपीट झालेल्या ठिकाणाची प्रत्यक्ष परिस्थिती आणि ज्या प्रमाणात गारा पडत आहेत, ते पाहता ही प्रासंगिक हिमवृष्टी आहे. त्यामुळे याकडे केवळ गारपीट म्हणून न पाहता जे घडले त्याची वैज्ञानिक चिकित्सा करणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर तज्ज्ञ समिती स्थापन करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.